मंगलवार, 15 मार्च 2016

इसकी टोपी उसके सर

इसकी टोपी उसके सर :- मित्रानो नमस्कार धंदा आला म्हणजे याची टोपी त्याला त्याची टोपी दुसऱ्याला हे तर आलंच पाहिजे कारण तुमचा पैसा त्याला त्याचा दुसऱ्याला हे अती महत्वाचे आहे कारण तुम्ही म्हणाल इकलाच पुणें पैसे देणे चुकीचे कारण धंद्यात कधीही थोडे पैसे आता द्या नंतर थोडया दिवसाने थोडे पैसे पुन्हा द्या म्हणजे तेच पैसे दुसऱ्याला फिरवा ,आणि पैशाच्या बाबतीत कधीही गाफील राहू नका,कधीही ग्राहकाला नकार देऊ नका , आणि मार्केट मध्ये व्यापारीशी ओळख झाल्यानंतर तोही आपल्याला उधारीत माल देतो त्याचाशी संपर्क चांगले ठेवा , आणि उधारीत धंदा बिलकुल करू नका कारण आपल्याला पैसे समोरच्याला लगेच देणे असते ग्राहक पैसे पूर्ण देत नसल्याने काही धंदे उधारी मुले बंद पडतात . ग्राहकाला धरून ठेवले सर्वं गोष्टी वेळेवर करण्याचा प्रयत्न करा समोरच्याला आपला प्रामाणिक पना कळेल कुणाचाही पैसा बुडवू नका . ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी मार्केटिंग चांगली केली पाहिजे होय मित्रानो आपला ग्राहक कोणता हे आपल्याला ओळखता आले पाहिजे ,आपल्या ग्राहकाचा गरजा ओळखुन आपण ग्राहकासमोर व्यवसाय केला तर तो कधीही अपयशी होऊ शकत नाही , व्यवसायाचे ठिकाण निवडणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असते ,आपला ग्राहक कोणत्या प्रकारचा आहे  हेही तितक्याच महत्वाचे आहे . आपला ग्राहक गरीब असेल तर त्याला खेचण्या करता आपल्याला कमी किमतीत त्याला त्याला माल विकावा लागेल मार्केटमध्ये टिकायचे असल्यास आपल्या कधीही दुसर्यापेक्षा कमी किमतीत वस्तू देण्याचा प्रयत्न करा . म्हणजे तुम्ही ग्राहकाला पटविण्यात यशस्वी होतात . एकदा ग्राहकाने आपली वस्तू घेतल्याने ग्राहकाच्या मनात आपले विषयी चांगले स्थान निर्माण होते. आपण त्याचाशी व्यवहार चांगला केल्यानंतर त्याचातोंडून तो आपल्या प्रॉडक्ट चे तो मार्केटिंग करत असतो म्हणून हि अशीच एक साखळी बनत जाते .

सोमवार, 14 मार्च 2016

मुद्रा लोन

मुद्रा लोन :- मुद्रा लोन हे तुम्हाला बँकेत मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला बँकेत गैरेंटर ची गरज नाही तुम्हाला दहा लाख रुपिया पर्यंत मिळू शकते तुम्हाला नवीन उधोग किंवा उधोग वाढीसाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात नवीन उधोगसाठी तुम्हाला                                                                                                                                                             *  प्रोजेक्ट रिपोर्ट                                                             * तुमचे प्रोजेक्ट च्या नावाने करेंनट अकाउंट                            बँकेत                                                                         * जागा भाड्याची असल्यास करार 100 स्टॅम्प                       पेपर वर                                                                       * शेती असेल तर जागेचा 7/ 12                                       * बांधकाम असेल तर बांधकामाचे  डिग्राम।                         * ग्रामपंचायतीचे किंवा महापालिका कै चे ना                         हरकत प्रमाणपत्र                                                           * खाण्यापिण्याचे वस्तू बनवणार असाल तर                           fassai चे lisense                                                      * मशिनरी कोटेशन                                                          * शॉप ऍक्ट                                                                    *जो उधोग करणार त्याविषयी प्रशिक्षण प्रमाणपत्र

शुक्रवार, 11 मार्च 2016

प्लास्टिक उधोग

प्लास्टिक उधोग :- ह्या उधोगा मध्ये प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक मग, प्लास्टिक बोलपेन, प्लेस्टिक डिश, प्लास्टिक टिफीन,प्लास्टिक बॅग असे व्यवसाय करता येऊ शकतो सद्या अपल्या आयुष्यात प्लास्टिक वस्तू ना महत्वाचे स्थान मिळाले आहे, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिक वस्तु चा उपयोग होतो. जेणे करून आपण वस्तू बनवून ती बाजार पेठेत विक्री करू शकतो , प्लास्टिक हि खराब होणारी वस्तू नाही  सकाळी चहा पिण्याचं ठिकाणी वापरला जाणारा प्लास्टिक ग्लास बनविण्यासाठी अगदी 30 पैसे खर्च होत असेल आणि तो विक्री करताना 90 अंदाजित विक्री करू शकतो ,आणि उधोग केल्यास तुम्हाला तुमचे पैसे हे 2 ते 3 वर्षात निगु शकतात योग्य नियोजन केल्यास हा व्यवसाय करता येऊ शकतो.

खरच महाराष्ट्र न 1 का

आपले मराठी माणसे व्यावसायिक जास्त दिसत नाहीत , फ्लिपकार्ट सारखी कंपनी जो रस्त्यावर पुस्तके विकायचा तो कंपनीचा मालक आहे, आमच्या रक्तात भिनल्याय कि आम्ही नोकरीच करणार तर का ,अंथरून पाहून पाय पसरायचे कारण आमची पिढी आम्हाला सांगत आली आहे स्वप्न पाहू नये ,धंदा मराठी माणसे करत नाहीत कारण आम्हाला यश मिळत नाही ,कारण आम्ही धंद्यात वेगळे काहीच करत नाही केला तर किराणा दुकान ,केलाय तर स्टेशनरी दुकान ,स्वीट ची दुकान राजस्थानी असतात ना ,हॉटेल शेट्टी ,कपड्याचे दुकान गुजराती हा पण नोकरी करणारे मराठी असतात हं मराठी माणूस आहे कुठे ,तुम्ही म्हणाल आहे महाराष्ट्र न 1 औधोगीक कांति महाराष्ट्र न 1 अहो पण उधोग कुणाचे आहेत , आम्हाला लक्स साबण का पाहीजे आम्हाला नाही बनवता येत का साबण बनवायला बाहेरची कंपनी लागेल का, टाटा ची कार का ,महिंद्रा ची फोर व्हिलर का, आम्ही म्हणतो नोकरी च चांगली ,लसूण ची पेस्ट बनवायला बाहेची कंपनी, मॅग्गी बनवायला बाहेरची कंपनी आम्ही हा विचार नाही करत ते मी जर केले तर पण काय पहिले घरातील माणसाना तोंड द्यावे लागते तरी म्हणतात महाराष्ट्र न 1

सोमवार, 7 मार्च 2016

बेकरी उद्योग

 
बेकरी उद्योग बेकरी उद्योग करण्यासाठी सोपा उद्योग मात्र आपले मराठी माणसे ह्यामद्ये पडत नाही कारण किचकट काम आपल्याला जमत नाही आपल्याला सोपी काम पाहिजेत बेकरी उद्योगात मशिनरी मध्ये फक्त ओव्हन ,प्लॅनेटरी मिक्सर हे पिट मळण्यासाठी लागते ,अत्यंत कमी खर्चात हा उधोग होऊ शकतो 3 लाख रुपये होऊ शकतो त्यासाठी प्रशिक्षण हे kvic येथे मिळू शकेल बेकरी उद्योगात योग्य मार्केटिंग केल्यास तुमचं प्रॉडक्ट चे एक ब्रँड निर्माण करू शकतात

शेअरबाजार

 
शेअरबाजार हे एक मध्यम पैसे कमीविण्यासाठी होऊ शकते, शेअर खरेदी विक्रीसाठी तुम्हाला डिमॅट असणे ,बँक खाते चेकबुक असणे आवश्यक आहे,डिमॅट हे मोतीलाल ओसवाल,अंगेल ब्रोकिंग,शेरखान यांच्याकडे उघडता येईल तसेच ओपनिंग चार्जेस द्यावे लागतील .      

व्यवसायावर नियंत्रण :-


व्यवसायावर नियंत्रण ठेवा प्रत्येक व्यवसायावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायाला शिस्त-नितीमूल्ये प्राप्त होऊन व्यवसाय नियंत्रणात राहतो. कोणत्याही व्यवसायाचे आरोग्य हें त्याच्या नफा - तोटा पत्रक आणि ताळेबंद यावरून पहिले जाते. पैसा हें नफा मोजण्याचे परिमाण आहे. पैसा व तो मिळवून देणाऱ्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याला महत्व आले आहे. व्यवस्थापन कोणताही व्यवसाय हा आज उत्तम व्यवस्थापनाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. किंबहुना व्यवसाय म्हणजेच व्यवस्थापन असते. माणसं, मटेरियल, मशीन्स, मनी आणि मार्केटिंग यांचा व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी आणि कमीत कमी साधनातून जास्तीत जास्त आउटपूट काढण्यसाठी व्यवस्थापनशाश्त्राचा वापर केला जातो. उत्तम व्यवस्थापन करून व्यवसायावर नियंत्रण आपण ठेवू शकतो. नफा-तोटा कोणत्याही व्यवसायाचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. रस्त्यावरच्या पण टपरीवाल्यापासून बहु राष्ट्रीय कंपनीच्या संचालाकापर्यंत प्रत्येकाला रोजची उलाढाल, फायद्या-तोट्याचे गणित, गुंतवणुकीचे निर्णय घावे लागतात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायद्याचे गणित आखाव लागते. भांडवलाची उभारणी, मालाचं, माणसाचं व्यवस्थापन, ग्राहकांच समाधान, स्पर्धा यांचा विचार करावा लागतो. काळाप्रमाणे व्यवसायाचे स्वरूप सतत बदलत ठेऊन व्यवसायावर नियंत्रण ठेवता येते. उद्देश आपल्या जीवनाचा उद्देश फक्त नफा कमवणे किंवा नफा प्राफ्त करणे नाही. जीवनाचा उद्देशाचा याहून अधिक खोलवर विचार अनेक तत्वज्ञानात केलेला आहे. त्यामुळे आपण कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाचे भविष्यातील नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

शनिवार, 5 मार्च 2016

नोकरी वाईट नाही

नौकरी करणे हे कदाचित वाईट नाही, पण नोकरी करणे म्हणजे जे आपल्याला समाधान पाहिजे ते मिळत नाही , नोकरी मध्ये असताना पगार वेळेवर असतो पण आपल्याला स्वातंत्र्य नसते ,आपली जी स्वप्न असतात ती नोकरी मुले अधुरी राहतात , ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगळे काहीतरी करणे गरजेचे असते ,आपण आपली स्वप्न एका कारणाने पाणी टाकण्याचा प्रयत्न करतो, मी जर केले तर लोक काय म्हणतील म्हणून

शुक्रवार, 4 मार्च 2016

नोकरी , म्हणजे कुणाचा तरी गुलाम

 मराठी माणसे फक्त नोकरी नोकरी नोकरी च्या मागे च का लागतात तर हे सर्वात मोठे कारण आहे मराठी माणसाला रिस्क घेण्याची ,व तसेच मागच्या पिडीने अंथरून पाहून पाय पसरावे हि मन घालून ठेवल्यामुळे त्या नियमतच मराठी माणसे गुरफटत राहतात ,आपल्या विचाराचे पलीकडे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नाही करत ,धंदा चालू नाही करत तेवड्यात विचार येतो कि ,धंदा नाही चालला मग ,पुढे काय करणार ,आपली कल्पना हि चुकीची आहे ,मार्केट मध्ये जी अडचण आहे ती जर आपण आपल्यासाठी संधी समजू शकतो, एकदा किराणा दुकान ठाकले असेल तर आपण हि तोच धंदा करणार कारण त्याचा धंदा चांगला चालतोय मानून आपण तेच करणार ,तसे जर नाही केले तर काहीतरी वेगळे ,जे कल्पना चे पलीकडे बघून जर केले तर तुमचा धंदा हा यशस्वी होऊ शकतो हे नक्की                                        नोकरी नोकरी नोकरी का तर फिक्स पगार दर महिन्याच्या, 7 तारखेला मिळणार हि हमी काम असो, किंवा नसो 8 तास काम करायचे जितके होईल तितके, त्याच आपल्याला काय घेणदेन मालक किती कमावतो ,तो मालक तुमच्याकडून काम करवून घेतो ,त्याचे डोके पहा तर तो बाहेरच्या राज्यातून आला आणि आपण आपली माती असून आपण माघे तर म्हणे पैसा नाही तर धंदा कुठून होईल ,पण धंदा करायला करायला पैसा नाही लागत त्याला लागत डोकं ते आपण वेगळ्या ठिकाणी गुंतवत असतो जिथून आपल्याला काहीच फायदा नसतो ,कुणी धंदा करायचं नाव घेतलं म्हणजे त्याच पाय केचायचे कसे ,किंवा तो पुढे जाऊ नये म्हणून त्याला काही गरज असेल मदत न करणे म्हणजे प्रत्येक माणसाची सर्वात मोठी चूक आहे ,किंवा मराठी माणसपर्यत पोहचत नाही म्हणून,  मराठी युवा उधोजक" मराठी युवाची गरज ओळखून फेसबुक पेज चालू केले आहे,                                               नौकरी करणे हे कदाचित वाईट नाही, पण नोकरी करणे म्हणजे जे आपल्याला समाधान पाहिजे ते मिळत नाही , नोकरी मध्ये असताना पगार वेळेवर असतो पण आपल्याला स्वातंत्र्य नसते ,आपली जी स्वप्न असतात ती नोकरी मुले अधुरी राहतात , ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगळे काहीतरी करणे गरजेचे असते ,आपण आपली स्वप्न एका कारणाने पाणी टाकण्याचा प्रयत्न करतो, मी जर केले तरलोक काय म्हणतील म्हणून