शुक्रवार, 4 मार्च 2016

नोकरी , म्हणजे कुणाचा तरी गुलाम

 मराठी माणसे फक्त नोकरी नोकरी नोकरी च्या मागे च का लागतात तर हे सर्वात मोठे कारण आहे मराठी माणसाला रिस्क घेण्याची ,व तसेच मागच्या पिडीने अंथरून पाहून पाय पसरावे हि मन घालून ठेवल्यामुळे त्या नियमतच मराठी माणसे गुरफटत राहतात ,आपल्या विचाराचे पलीकडे काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न नाही करत ,धंदा चालू नाही करत तेवड्यात विचार येतो कि ,धंदा नाही चालला मग ,पुढे काय करणार ,आपली कल्पना हि चुकीची आहे ,मार्केट मध्ये जी अडचण आहे ती जर आपण आपल्यासाठी संधी समजू शकतो, एकदा किराणा दुकान ठाकले असेल तर आपण हि तोच धंदा करणार कारण त्याचा धंदा चांगला चालतोय मानून आपण तेच करणार ,तसे जर नाही केले तर काहीतरी वेगळे ,जे कल्पना चे पलीकडे बघून जर केले तर तुमचा धंदा हा यशस्वी होऊ शकतो हे नक्की                                        नोकरी नोकरी नोकरी का तर फिक्स पगार दर महिन्याच्या, 7 तारखेला मिळणार हि हमी काम असो, किंवा नसो 8 तास काम करायचे जितके होईल तितके, त्याच आपल्याला काय घेणदेन मालक किती कमावतो ,तो मालक तुमच्याकडून काम करवून घेतो ,त्याचे डोके पहा तर तो बाहेरच्या राज्यातून आला आणि आपण आपली माती असून आपण माघे तर म्हणे पैसा नाही तर धंदा कुठून होईल ,पण धंदा करायला करायला पैसा नाही लागत त्याला लागत डोकं ते आपण वेगळ्या ठिकाणी गुंतवत असतो जिथून आपल्याला काहीच फायदा नसतो ,कुणी धंदा करायचं नाव घेतलं म्हणजे त्याच पाय केचायचे कसे ,किंवा तो पुढे जाऊ नये म्हणून त्याला काही गरज असेल मदत न करणे म्हणजे प्रत्येक माणसाची सर्वात मोठी चूक आहे ,किंवा मराठी माणसपर्यत पोहचत नाही म्हणून,  मराठी युवा उधोजक" मराठी युवाची गरज ओळखून फेसबुक पेज चालू केले आहे,                                               नौकरी करणे हे कदाचित वाईट नाही, पण नोकरी करणे म्हणजे जे आपल्याला समाधान पाहिजे ते मिळत नाही , नोकरी मध्ये असताना पगार वेळेवर असतो पण आपल्याला स्वातंत्र्य नसते ,आपली जी स्वप्न असतात ती नोकरी मुले अधुरी राहतात , ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगळे काहीतरी करणे गरजेचे असते ,आपण आपली स्वप्न एका कारणाने पाणी टाकण्याचा प्रयत्न करतो, मी जर केले तरलोक काय म्हणतील म्हणून

3 टिप्‍पणियां:

  1. व्यवसायावर नियंत्रण ठेवा

    प्रत्येक व्यवसायावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायाला शिस्त-नितीमूल्ये प्राप्त होऊन व्यवसाय नियंत्रणात राहतो.

    कोणत्याही व्यवसायाचे आरोग्य हें त्याच्या नफा - तोटा पत्रक आणि ताळेबंद यावरून पहिले जाते. पैसा हें नफा मोजण्याचे परिमाण आहे. पैसा व तो मिळवून देणाऱ्या व्यवसायावर नियंत्रण ठेवण्याला महत्व आले आहे.

    व्यवस्थापन

    कोणताही व्यवसाय हा आज उत्तम व्यवस्थापनाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. किंबहुना व्यवसाय म्हणजेच व्यवस्थापन असते. माणसं, मटेरियल, मशीन्स, मनी आणि मार्केटिंग यांचा व्यवस्थापन म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त नफा कमवण्यासाठी आणि कमीत कमी साधनातून जास्तीत जास्त आउटपूट काढण्यसाठी व्यवस्थापनशाश्त्राचा वापर केला जातो. उत्तम व्यवस्थापन करून व्यवसायावर नियंत्रण आपण ठेवू शकतो.

    नफा-तोटा

    कोणत्याही व्यवसायाचा उद्देश हा जास्तीत जास्त नफा मिळवणे हा असतो. रस्त्यावरच्या पण टपरीवाल्यापासून बहु राष्ट्रीय कंपनीच्या संचालाकापर्यंत प्रत्येकाला रोजची उलाढाल, फायद्या-तोट्याचे गणित, गुंतवणुकीचे निर्णय घावे लागतात. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायद्याचे गणित आखाव लागते. भांडवलाची उभारणी, मालाचं, माणसाचं व्यवस्थापन, ग्राहकांच समाधान, स्पर्धा यांचा विचार करावा लागतो. काळाप्रमाणे व्यवसायाचे स्वरूप सतत बदलत ठेऊन व्यवसायावर नियंत्रण ठेवता येते.

    उद्देश

    आपल्या जीवनाचा उद्देश फक्त नफा कमवणे किंवा नफा प्राफ्त करणे नाही. जीवनाचा उद्देशाचा याहून अधिक खोलवर विचार अनेक तत्वज्ञानात केलेला आहे. त्यामुळे आपण कोणताही व्यवसाय करताना त्या व्यवसायाचे भविष्यातील नियोजन योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे.

    जवाब देंहटाएं
  2. बेकरी उद्योग बेकरी उद्योग करण्यासाठी सोपा उद्योग मात्र आपले मराठी माणसे ह्यामद्ये पडत नाही कारण किचकट काम आपल्याला जमत नाही आपल्याला सोपी काम पाहिजेत बेकरी उद्योगात मशिनरी मध्ये फक्त ओव्हन ,प्लॅनेटरी मिक्सर हे पिट मळण्यासाठी लागते ,अत्यंत कमी खर्चात हा उधोग होऊ शकतो 3 लाख रुपये होऊ शकतो त्यासाठी प्रशिक्षण हे kvic येथे मिळू शकेल बेकरी उद्योगात योग्य मार्केटिंग केल्यास तुमचं प्रॉडक्ट चे एक ब्रँड निर्माण करू शकतात

    जवाब देंहटाएं
  3. शेअरबाजार हे एक मध्यम पैसे कमीविण्यासाठी होऊ शकते, शेअर खरेदी विक्रीसाठी तुम्हाला डिमॅट असणे ,बँक खाते चेकबुक असणे आवश्यक आहे,डिमॅट हे मोतीलाल ओसवाल,अंगेल ब्रोकिंग,शेरखान यांच्याकडे उघडता येईल तसेच ओपनिंग चार्जेस द्यावे लागतील

    जवाब देंहटाएं